Kitchen Tricks & Tips
१. वांगी चिरल्यावर लगेचच पाण्यात टाकावित किंवा पाण्यातच चिरावीत म्हणजे ती काळी पडणार नाहीत.
२. केळी फ्रीजमध्ये ठेवताना काळ्या पिशवित ठेवावीत म्हणजे केळ्याच्या साली काळ्या पडत नाहीत.
३. भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठ बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ घालावे.
४. फोडणीत कांदा घातल्यावर त्यात थोडे मीठ घालावे म्हणजे तो जळतही नाही आणि लवकर शिजतो.
५. हिरव्या भाज्या शिजवताना त्यात चिमुठभर साखर घालावि म्हणजे त्यांचा हिरवा रंग टिकून राहतो.
६. फ्रीजमध्ये अर्ध लिंबू चिरून एखादया कोपऱ्यात ठेवावे म्हणजे उग्र वास येत नाही.
७. भेंडीची भाजी करतेवेळी त्यात थोडासा लिंबू रस घालावा म्हणजे भाजी चिकट होत नाही.
८. कारल्याची भाजी करताना अर्धा तास अगोदर करली चिरून त्यांना मीठ चोळून ठेवावे म्हणजे कारल्याचा कडवटपना थोडासा कमी होतो.
९. रवा आणल्यावर जर तो थोडासा भाजून ( गरम करून) ठेवला तर तो हिरवा पडत नाही किंवा त्यात अळया होत नाही व तो जास्त वेळ टिकतो.
१०. कांदे व बटाटे कधीच एकत्र ठेवू नयेत नाहीतर बटाट्यांना कोंब येतात व ते ख़राब सुद्धा होतात.
११. हिरव्या मिरच्यांचे देठ काढून फ्रिजमध्ये ठेवल्यास मिरच्या जास्त दिवस टिकतात.
१२. खोबऱ्याचे वाटप जास्त झाल्यास त्यात थोडेसे मीठ घालून फ्रिज मध्ये डब्यात ठेवावे म्हणजे ते ३-४ दिवस ख़राब होत नाही.
१३. लसूण सोलल्यावर हाथाचा वास जाण्यासाठी हाथावर थोडे लिंबू चोळावे.
१४. लसणाची साल निघण्यासाठी ती दोन्ही बाजूंनी ठेचुन घ्यावी साल पटकन निघते.
१५. भात शिजवताना त्यात थोडेसे तूप किंवा तेल घालावे म्हणजे भात मोकळा होतो.
१६. तुरीची डाळ शिजवताना त्यात चिमुठभर हळद घातली की ती लवकर शिजते.
१७. पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी चण्याची डाळ २-३ पाणी काढून स्वच्छ धुवून क़मीत कमी २ तास भिजू घालावि व त्याच पाण्यात शिजू दयावी.
१८. पुरणपोळीची डाळ कुकरला न लावता जर ती ग्यासवर भांडयात शिजवली तर ती जास्त चविस्ट लगते.
१९. पुरणपोळीचे आवरण बनवण्यासाठी मैदा थोडा पातळ भिजवून त्यात भरपूर तेल घालून ते तेल त्यात २-३ तास मुरू दयावे म्हणजे पोळ्या छान नरम होतात.
२०.वडा पाव बनवताना पाव जर मधून कापायचे असतील तर सुरीला थोडेसे तेल लावून कपावे म्हणजे एकसारखे कापले जातात.
२१. मसाला जास्त काळ टिकण्यासाठी त्यात एखादा हिंगाचा खडा टाकून ठेवावा.
२२. चपातीचे मळलेले पिठ उरले तर त्याला थोडेसे तेल लावून ते फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे ते काळे पडत नाही.
२३. रवा अणल्यावर तो थोडासा (परतून) गरम करून ठेवावा म्हणजे घाईच्या वेळेस तो पटकन बनवता येतो.
२४. आंल लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त दिवस तिकवायची असेल तर त्यात एक छोटा चमचा गरम तेल व थोडेसे मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवावी.
२५. फोडणी तयार करताना तेल गरम झाले की ग्यास कमी करावा व नंतर फोडणीचे साहित्य घालावे म्हणजे फोडणी करपत नाही.