उडीदाचे पापड| Papad
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/Papad.html
साहित्य :
१)१/२ किलो उडीद डाळीचे पिठ
२)१/२ छोटा चमचा जिरे
३)१/२ छोटा चमचा ओवा
४)१/४ चमचा खाण्याचा सोडा
५)मिठ चवीनुसार
६)४ मोठे चमचे तेल.
कृती:
डाळीच्या पिठात जिरे,ओवा, खाण्याचा सोडा व पाणी घालुन घट्ट पिठ मळून घ्यावे.
हे पिठ कमीत कमी २ तास झाकुन ठेवावे.
२ तासानंतर चांगले चेचून घ्यावे.
छोटे छोटे गोळे करून छान पातळ लाटुन घ्यावे.
लाटताना पोळपाटाला चिकटत असतील तर तेल लावावे.
सुके पिठ लावू नये.
हे पापड उन्हात वाळू घालावे.
जास्त वेळ उन्हात ठेऊ नये. फक्त वाळेपर्यंत. यांना जर जास्त उन्हात ठेवल तर ते तुटतात.