बेसन लाडू

Besan Laddu in English

वेळ :  

१५ मिनिटे ,
१५-१६ मध्यम आकाराचे












साहित्य :

१) २०० ग्राम बेसन (लाडूसाठी  दळून आणलेल)
२) २०० पिठी साखर  
३) १२० ग्राम तुप   
४)साधरण १/२ चमचा वेलची पुड 

कृती:

जाड बुडाच्या पातेल्यात तुप गरम करत ठेवावे. त्यात बेसन घालून मंद अग्नीवर खमंग भाजुन घ्यावे. 

लालसर भाजले  कि त्यात वेलची पुड घालावी. 

आचेवरून बाजूला करून थंड होऊ दयावे. 

थंड झाले कि त्यात पिठी साखर घालून छान एकत्र करावे. 

साधारण १५-१६ लाडू वळून घ्यावे. 













टीप :

बेसन लाडू बनवण्यासाठी बाहेर मिळणार बेसन वापरू नये. 

चण्याची डाळ कढईमध्ये गरम करून घ्यवी. 

कमी प्रमाणात असेल तर हि डाळ घरी मिक्सरवरहि बारीक करता येते.  

किंचित जाडसर ठेवावी लाडू छान होतात. खातानाही तोंडात चिकटत नाहीत. 

Related

Sweets 1032689101713544975

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item