बदाम हलवा | Badam Halwa
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/badam-halwa.html
Badam Halwa in English
वेळ:
३० मिनिटे,
३ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १/२ वाटी बदाम
२) १ वाटी दूध
३) १ छोटा चमचा केशर
३) १ छोटा चमचा केशर
४) पाऊन वाटी
साखर
५) ३ मोठे चमचे तूप
६) १/४ चमचे वेलची पूड
कृती :
बदाम कोमट पाण्यात १/२
तास भिजू घालावे.
बदामाची सालं काढून
घ्यावी.
मिक्सरला बदाम व ४ चमचे दूध
एकत्र करून छान पेस्ट करून घ्यावी.
एका जाड बुडाच्या भांडयात
तूप गरम करावे.
गरम तुपावर बदामाची पेस्ट
घालून मंद ग्यासवर लालसर भाजून घ्यावी.
सतत ढवळत राहावे
भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.
केशर थोडयाशा कोमट दुधात
विरघळून घ्यावा.
थोडेसे दूध व पाणी बदामाच्या
मिश्रणात घालून ढवळावे. केशर घातलेले दूधही घालावे.
पाणी व दूध सुकले की साखर
घालावी.
साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत
राहावे.
हा हलवा गरम किंवा थंड
आवडीनुसार खाता येतो.