बासुंदी

वेळ :  

४५ मिनिटे ,

२ व्यातींसाठी. 

साहित्य:

१)  १ लिटर दूध 
२)  १/२ वाटी साखर
३) १/२ छोटा चमचा वेलची पूड
४) ४ बदामांचे काप 
५) २-३ पिस्तांचे काप 
६) ४-५ काजू  
७) १० केशरच्या कांड्या

कृती:

दूध एका जाड बुडाच्या भांडयात गरम करत ठेवावे.  

एक सारखे ढवळावे त्यामुळे दूध भांडयाला लागणार नाही. 

दूध आहे त्यापेक्ष्या अर्धे होईपर्यंत ढवळत राहावे. 

केशराच्या कांड्या एका वाटीत गरम दूध घेऊन त्यात २-३ मिनिटे बुडवून ठेवाव्या म्हणजे केशाराला छान रंग येतो. 

आता आटलेल्या दुधात साखर,पिस्ता, बदाम व काजूचे तुकडे घालावे. 

थोडेसे तुकडे सजावटीसाठी  बाजूला करून ठेवावे. 

केशर घालून अजून ५ मिनिटे दूध उकळावे. 

वेलची पूड घालावी. 

देताना वरून छान बदाम, पिस्ता व काजूचे तुकडे घालून थंड किंवा गरम आवडीनुसार दयावी. 



Related

Sweets 388595642873968768

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item