तांदुळाची खीर | Rice Kheer
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/rice-kheer_23.html
२-३ व्यक्तींसाठी .
साहित्य :
१) १ लिटर साईसकट दूध
२) १/२ छोटा चमचा तूप
३) १/४ कप बासमती तांदूळ
४) ५-६ छोटे चमचे साखर
५) ३-४ वेलच्यांची पूड
६) ४ बदाम व काजू प्रत्येकी
७) एक चिमुठ केशर
७) एक चिमुठ केशर
तांदूळ स्वच्छ धुवून ३० मिनिटे भिजू घालावे.
एका भांडयात तूप गरम करावे .
भिजवलेल्या तांदुळातले पाणी काढून हे तांदूळ २-३ मिनिटे गरम तुपावर भाजून घ्यावे.
अगदी लालसर भाजू नयेत. फक्त पाणी सुकेपर्यंत भजावे.

दुसऱ्या बाजूला दूध गरम करावे चांगले उकळू दयावे.
उकळी आल्यावर ग्यास मंद करून भाजलेले तांदूळ त्यात घालावे .
एकसारखे ढवळत राहावे .
तांदूळ शिजेपर्यंत आणि दूध आहे त्यापेक्षा अर्धे होईस्तोवर सतत ढवळत राहावे.
भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.
या सर्व कृतीसाठी साधारण ३०-३५ मिनिटे लागतात .
तांदूळ शिजल्यावर व दूध चांगले आटल्यावर साखर , वेलची पूड, केशर व काजू बदाम ची काप घालावी.
अजून ५ मिनिटे चांगली उकळू दयावी.
आता ग्यास वरून बाजूला करून थंड करावी .
ही खीर थंड किंवा गरम आवडीनुसार खावयास दयावी.