साबुदाणा खिचडी | Sabudana Khichadi

२०मिनिटे,
 व्यक्तीन साठी.

साहित्य :
) दीड वाटी साबुदाणा 
) १/२ वाटी बटाटयाच्या काचऱ्या 
)  १/२ वाटी शेंगदाण्याच  कुट 
४)   हिरव्या मिरच्या
)  / चमचा लिंबू रस  
)  कोथिंबीर 
)  जिरे  
)  मिठ  चवीनुसार 
१०) १ चमचा साखर 
११) २ चमचे तूप

कृती :

साबुदाणा  धुवून पाणी काढून  ५-६ तास बाजूला करून ठेवावा. 

आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालून भिजू ठेवावा.  


शेंगदाणे  भाजून थंड करावे.  शेंगदाण्याची साल काढून घ्यावी. 

शेंगदाणे व मिरची एकत्र करून वाटून कुट करून घ्यावे. 

एका भांडयात साबुदाणा घेऊन त्यात वाटलेले शेंगदाणे,मिठ एकत्र करून घ्यावे

तूप गरम करून त्यात जिरे घालावे. बटाटयाच्या काचऱ्या घालून छान परताव्या. चांगल्या शिजू द्याव्या. 

एकदा का काचऱ्या शिजल्या कि वरील साबुदाणा व शेंगदाण्याचे मिश्रण घालावे. 

चांगले परतावे.  

साबुदाणा शिजला कि त्यात लिंबाचा रस, साखर व कोथिंबीर घालावी. 

दह्यासोबत खावयास दयावे. 

टिप:

साबुदाणा चांगला भिजण्यासाठी धुतल्यावर थोडेसे पाणी ठेऊन भिजवावा म्हणजे तो छान फुगून येतो. 

भिजवलेला साबुदाणा भिजला कि नाही हे पाहण्यासाठी एखादा साबुदाणा हाथावर घेऊन बोटाने दाबून पहावा. 

बटाटयाच्या काचऱ्या ऐवजी बटाटा उकडून फोडी घालता येतात. 



Related

Navratri 4511543313917088696

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item