कडाकणी | Kadakani

Kadakani in English

वेळ:
२० मिनिटे.
साहित्य:
) १ वाटी मैदा 
२) १वाटी बारिक रवा 
३) पाव वाटी साखर  
४) १/२ वाटी दूध  
५) मीठ चवीनुसार 
६) तेल तळण्यासाठी  कृती:

प्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये रवा, मैदा व मीठ एकत्र करून घ्या. त्यात गरम तेलाचे मोहन घालून घ्या.

दूध व साखर आधीच एकत्र करून ते वरिल मिश्रणावर घालून घट्ट पीठ मळून २-३ तास बाजूला करून ठेवा.

हे पीठ कुटुन घ्या.

कुठलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्या. सुरीने मधोमध टोचे मारून घ्या.

तेल गरम करून छान खरपुस तळुन घ्या.

सर्विंग प्लेट मध्ये गरमा गरम सर्व्ह करा.
Related

Navratri 7551629087706635944

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item