Green Peas Vada | मटारचे वडे
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/matarche-vade.html
Green peas vada recipe is very delicious snack dish & serve this as a snack or as a side dish along with a meal.
Matarche Vade in Marathi
Matarche Vade in Marathi
वेळ:
२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
सरणासाठी लागणारे साहित्य :
१) १ वाटी हिरवे वाटाणे (मटार)
२) १ कांदा बारिक चिरलेला
३) ४-५ कढीपत्त्याची पाने
४) १ छोटा चमचा जिरे
५) १ छोटा चमचा लाल मिरची पूड
६) १ छोटा चमचा हळद
७) कोथिंबीर
८) आंल लसूण पेस्ट
९) २ छोटे चमचे तेल
१०) मीठ चवीनुसार
अवरणासाठी लागणारे साहित्य:
१) १ वाटी बेसन
२) २ छोटे चमचे तांदळाचे पीठ
३) हळद
४) मीठ
५) तेल तळनासाठी
कृती:
एका भांडयात थोडस तेल गरम करून त्यात वाटाणे २-३ मिनिटे परतावे व बाजूला काढून ठेवावे.
थंड झाले की मिक्सर मधून काढून जाडसर वाटून घ्यावे.
तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्त्यांची पाने, बारिक चिरलेला कांदा, आल लसूण
पेस्ट, लाल मिरची पूड, हळद, वाटून घेतलेले वाटाणे व मीठ घालून मंद ग्यासवर ५ मिनिटे
परतावे.
मिश्रण थंड झाले की त्याचे छोटे छोटे गोळे करून ठेवावे.
चण्याच पीठ एका भांडयात घेवून त्यात तांदळाचे पीठ, हळद, मीठ व आवश्यकतेनुसार पाणी
घालून पीठ तयार करावे.
कढईत तेल गरम करावे.
वरील मिश्रणाचा एक एक गोळा तयार पीठात बुडवून गरम तेलात लालसर तळुन घ्यावे.
पेपर वर काढून जास्तीच तेल काढून घ्यावे.
गरमच खोबऱ्याच्या किंवा लसणाच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.
Labels:
Batata Wada, Batata Vada, Potato Vada, Maharashtrian Batata wada, Mumbai Vada Pav, Vada Pav recipe, Aloo Bonda Recipe, gas stoves
Batata Wada, Batata Vada, Potato Vada, Maharashtrian Batata wada, Mumbai Vada Pav, Vada Pav recipe, Aloo Bonda Recipe, gas stoves