Limbache Lonche | Lemon(Nimbu) Pickle(Achar)-Oil free Recipe in Marathi | बीन तेलाचे लिंबाचे लोणचे

Oil Free Lime Pickle Recipe in English:

Free pickle recipe of lemon.The no-effort recipe,made throughout the year, is enjoyed best with dalrice,khichdi etc.Know More!

पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे
कृती स्रोत : माझ्या सासुबाई 
साधारण १/२ किलो 


साहित्य:

१) १५ लिंबू 
२) १५० ग्रॅम मीठ
३) २ चिमूठ हींग
४) २ मोठे चमचे लाल तिखट
५) १ छोटा चमचा हळद
६) ३-४ चमचे साखर  

कृती:

साधारण १/२ किलो लोणच मावेल एवढी काचेची बरणी घ्यावी.

लिंबू चांगले धुवून घ्यावे व कोरडया कापडाने फुसावे त्यांना पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी.

या लिंबांचे ८-१० टुकडे करावे.

बरणी कापडाने फुसुन कोरडी करावी आता त्यात लिंबाचे तुकडे घालावे त्यात मीठ, लाल मिरची पूड, हींग, साखर घालून कोरडया चमच्याने मिक्स करून घ्यावे.

बरणीचे झाकण लावून ८ दिवस ठेवावे.

या ८ दिवसात दररोज दिवसातून १ तरी कोरडया चमच्याने ढवळावे.

८ दिवसांनी तुमचे लोणचे तयार आहे खाण्यासाठी.

या लोणच्याची जर व्यवस्तीत काळजी घेतली तर हे १ वर्ष ही टिकते.

हे लोणचे वरण भात, दही भात व खिचडी कशाही सोबत छान लागत. 


टिप:

हे लोणच टिकविण्यासाठी याला कशाही प्रकारे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. 

बरणी, लिंबू व चमचा चांगले कोरडे करून घ्यावे. 




Labels : maharashtrian Limbache Lonche,Vade, Nimbu Pickle, Achar, lemon, Limbu
cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor





Related

Traditional 7470109838335551507

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item