Sitaphal (Custard Apple) Basundi Recipe in Marathi | सीताफळ बासुंदी
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/10/sitafal-custard-apple-basundi-recipe.html
Sitafal Basundi is a seasonal sweet dish prepared seasonally dependeng on the availability of custard apple. The basundi with the twist of fruit is made mainly during festivals. Make this mouth-watering and craving for more recipe this Navratri festival. Read More to get the detailed method of this awesome sweet dish. Sitafal Basundi is a well-blended unique milk preparation with the mixure of sitaphal pulp and sweeteners.
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: ४५ मिनिटे
वाढणी ४ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १ लिटर दूध
२) १ सीताफळ
३) ३/४ वाटी साखर
४) वेलची पूड
५) बदाम, काजू, मनुका आवडीनुसार
कृती:
जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करावे.
अधून मधून ढवळत रहावे.
पातेल्यात छोटी स्टीलची बशी टाकून ठेवावी.
किंवा ढवळण्यासाठी वापरत असलेला चमचा उकळत्या दूधात ठेवावा म्हणजे दूध उतू जाणार
नाही.
दूध चांगले आटू द्यावे.
दूध आटूण अर्धे झाले की त्यात साखर घाला.
बदाम, काजूचे काप व मनुका घालावी.
अजून १० मिनिटे उकळावी.
आच बंद करावी त्यात वेलची पूड घालावी.
पूर्ण थंड होवू द्यावी.
सीताफळाच्या बिया काढून गर तयार करावा.
हा गर थंड झालेल्या बासुंदीमध्ये घालावा.
चमच्याने ढवळून घ्यावा.
नंतर ही बासुंदी फ्रीजमध्ये कमीत कमी ३-४ तास ठेवा.
थंड झाली कि सर्व्ह करावी.