मालवणी साधे पोहे | Malvani Sadhe Pohe


वेळ :  

१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :
१)दगड़ी  पोहे २ वाट्या 
२)२ छोटे चमचे तेल 
३)२ चमचे शेंगदाणे 
४)१/२ चमचा जिरे 
५) १/२ चमचा मोहरी 
६)२ हिरव्या मिरच्या 
७) कढीपत्ता 
८)थोडीशी साखर 
९)ओले खोबरे १/२ वाटी 
१०)कोथिंबिर
११)हळद 
१२)लिंबु 
१३)चविनुसार मिठ 

कृती :

पोहे चांगले धुऊन १० मिनिटे ठेवावे. 




नंतर एका कढ़ई मध्ये तेल गरम करुण  त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी शेंगदाणे घालून भाजून घ्यावे. 

पोह्यांना मिठ आणि हळद पहिलेच  लाऊन घ्यावे व  फोडणी होईपर्यंत बाजूला करून ठेवावे. 

आता  त्यात पोहे घालावे.

थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी. 

नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे. 

देताना  वरून ओलं खोबर आणि कोथिबीर भुरभुरावी. 

टीप :
पोह्यांना धुऊन त्यात मिठ व हळद लाऊन ठेवल्यास मिठ व हळद सर्वत्र लागते आणि पोह्यांना रंगही चांगला येतो. 

Related

Breakfast 1861293298367849530

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item