केशरी शिरा | Keshari Sheera
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/keshari-shira.html
वेळ :
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)मध्यम रवा १वाटी
२)१/२ वाटी साजूक तूप
३)१/२ वाटी साखर
४)२ वाटया
(पाव लिटर) दुध
५)१/२ वाटी पाणी
६) वेलची,जायफळ पूड
७)आवडीनुसार काजू,बदाम,बेदाणे,चारोळी
८)केशराच्या काड्या १०-१२
कृती :
प्रथम एका भांड्यात तूप गरम करून रवा खमंग भाजून घ्यावा.
थोडासा लालसर झाला की मग एका भांड्यात पाणी गरम करून घ्यावे आणि थोडे थोडे करून घालावे पाणी पुर्ण सुकले की दुध घालावे.
रवा छान फुलाला की त्यात साखर व वरील सर्व सुकामेवा घालावा.
वरून वेलची,जायफळ पूड व केशर घालून चांगले परतून झाकन ठेऊन ५मिनिटे मंद अग्नी वर ठेवावा.
टीप :
केशरच्या काड्या गरम दुधात घालून रंग बदलला कि रव्यावर घालाव्यात म्हणजे सुंदर रंग येतो.
१)मध्यम रवा १वाटी
प्रथम एका भांड्यात तूप गरम करून रवा खमंग भाजून घ्यावा.