रताळ्याचे थालीपीठ /Ratalyache Thalipeeth
Ratalyache Thalipeeth in English वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १)कणिक २ वाट्या २)१मोठा कांदा बारीक चिरून ...

वेळ :
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)कणिक २ वाट्या
२)१मोठा कांदा बारीक चिरून
३)१मोठ्या आकाराचे रताळे
४)१ छोटा चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
९)आल लसुन पेस्ट १छोटा चमचा
१०)१छोटा चमचा तेल
११)अर्धी वाटी तूप
१२)पांढरे तीळ १छोटा चमचा
प्रथम एका भांड्यात कणिक घेऊन त्यात मिठ,तीळ,आणि जीर घालून छान मळून घ्यावे . एका भांड्यात तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालवा लालसर भाजून त्यात ,जिर, मोहरी,आलं लसुन पेस्ट आणि मिठ व हळद घालून उकडलेला राताळ घालून भाजी करून घ्यावी. आता पिठाचा एक गोळा घेऊन त्यात भाजी भरून लाटून खमंग भाजून घ्यावी. बाजूने तव्यावर तूप सोडावे.