मसाले भात | Masale Bhat

Masale Bhat in English वेळ :   ३० मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १)१ वाटी बासमती तांदूळ  २)१ वाटी हिरवे वाटणे  ३)२ छोटे चम...

Masale Bhat in English

वेळ :  

३० मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाटी बासमती तांदूळ 

२)१ वाटी हिरवे वाटणे 
३)२ छोटे चमचे जिरे,धणे,कोथिंबीर 
४)३-४ मिरी 
५)४-५ सुख्या मिरच्या 
६)१ छोटा चमचा साखर किंवा गूळ 
७)२ छोटे चमचे तेल 
८)१/२ चमचा हळद
९)चविनुसार  मिठ 
१०)१/२ मोहरी 
११)१ छोटा चमचा गोडा मसाला 
१२)काजू ५-६
१३)ओल खोबर

कृती :

वरील मसाला जिरे,धणे,कोथिंबीर,मिरी,सुख्या मिरच्या मिक्सरला लावून बारिक वाटून घ्यावा. 
तांदूळ धुवून १० मिनिटे निथळत ठेवावे. 
एका भांड्यात तेल गरम करुण मोहरी घालून फोडणी तयार करावी. मोहरी तडतडली की काजू आणि तांदूळ व हिरवे वाटणे  परतून घ्यावेत. 
दुसऱ्या ग्यासवर पाणी गरम करून घ्यावे. 
पाणी नेहमी तांदुळाच्या दुप्पट घ्यावे. म्हणजे १ वाटी तांदुळाला २ वाटी पाणी. 
तांदूळ चांगले परतले की त्यात गरम पाणी घालावे. हळद  व मिठ घालून मंद 
ग्यासवर झाकून ठेवावे. 
एक  उकळी आली की वरील वाटलेला मासाला,गोडा मसाला व साखर घालावे.  
झाकण ठेवून मंद ग्यासवर वाफ येऊ द्यावी. 
देताना वरुण कोथिंबीर आणि खोबरे घालावे. आवडत असल्यास साजूक तुपही वरून खुप छान लागते. 



Related

Rice 553990811604917524

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item