कोथिंबीर वडी | Kothimbir Vadi

Kothimbir Vadi in English


वेळ :  
२० मिनिटे,
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१) २ वाटया बारीक चिरलेली कोथिंबीर 

२) १ वाटी चण्याची डाळ 
३) हळद
४) चविनुसार  मिठ 
५) ४-५ ओल्या हिरव्या मिरच्या  
६) आलं लसुन १ छोटे चमचे
७) जिरे २ छोटे चमचे 
८) पांढरे तीळ १छोटा चमचा 
९) तळणासाठी तेल
१०) चवीपुरते मिठ 
११) ओलं खोबरं १/२ वाटी  

कृती :

चण्याची डाळ २-३तास पाण्यात भिजू दयावी. 

मिक्सरवर बारीक वाटून घ्यावी. 

आलं लसुन आणि हिरवी मिरची बारीक वाटून त्यात घालावी. 

एका भांडयात वरील मिश्रण,हळद,बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे,पांढरे तीळ व मिठ एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे. 

थोडे पाणी घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्यावे. 

एका प्लेटला तेल लावून हे मिश्रण थोडस जाडसर  पसरून घ्यावे. 

आता प्रेशर कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनटे वाफ येऊ दयावी. 

ढोकळा पत्रातसुद्धा छान होतात. थंड झाल्यावर तुकडे पाडुन छान 

गरम तेलात कुकुरीत तळून घ्यावे किंवा शालो फ्राय करून घ्यावे. 

वरून छान खोबर घालून हिरव्या चटणीसोबत खावयास दयावी. 

Related

Snacks 7629288245453585488

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item