बदाम खीर | Badam Kheer
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/badam-kheer.html?m=0
Badam Kheer in English
बदाम खीर म्हणजे लहान मोठया सर्वांनाच आवडणारा पदार्थ. थंडीच्या दिवसात बच्चे कंपनीसाठी आवर्जुन करावा असा.
साहित्य :
१)२५-३० बदाम
२)१ लिटर दुध
३)१/४ पाणी
४)१/२ वाटी साखर
५)३-४ वेलच्यांची पुड
६)१० काढ्या केशर
कृती:
बदाम १५-२० मिनिटे थोडयाश्या कोमट पाण्यात भिजत ठेवावे.
साल काढून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालुन बारीक वाटुन घ्यावे.
जाड बुडाच्या पातेल्यात दुध गरम करावे . साखर व बदामची पेस्ट घालुन मध्येमध्ये ढवळत राहावे.
छान दुध घट्ट होईस्तोवर ढवळत राहावे.
वेलची पुड घालुन ढवळून घ्यावी.
आता ग्यासवरून उतरून बाजूला ठेवावी.
केशर थोडयाश्या गरम दुधात मिसळून घ्यावा, म्हणजे त्याचा रंग सुंदर येतो.
हे दुध खीरीत घालावे.
थंड करून छान खावयास घ्यावी.
बदाम खीर म्हणजे लहान मोठया सर्वांनाच आवडणारा पदार्थ. थंडीच्या दिवसात बच्चे कंपनीसाठी आवर्जुन करावा असा.
वेळ :
३०मिनिटे , २ व्यक्तीन साठी .