आम्रखंड
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/blog-post_3880.html?m=0
Amrakhand in English
वेळ :
साहित्य :
१)१/२किलो चक्का
२)१ वाटी आंब्याचा रस
३)पाऊन वाटी साखर
४)५-६ वेलचींची पूड
५)५-६ बदाम
६)जायफळ पूड
कृती:
चक्का बनवण्यासाठी दही पातळ कपडयात घट्ट बांधून ठेवावे. पाणी निघून जाऊन जे उरेल तो चक्का. साधारण १०-१२ तास लागतात.
हा चक्का एका भांडयात घेऊन त्यात आंब्याचा रस आणि साखर घालुन चांगल एकजीव करा. १५-२० मिनिटे साखर वितळण्यासाठी बाजूला ठेवावे.
वरील मिश्रण पुरण यंत्राला लावून घ्या म्हणजे त्यात दाणे राहणार नाही.
वेलची पूड,जायफळ पूड ,आणि बदामचे काप घालून फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावे. पुरीसोबत खावयास दयावा.
टीप :
घरी काढलेला आंब्याचा रस वापरत असाल तर रस काढतेवेळी पाणी घालू नये. नाहीतर आम्रखंड पातळ होऊ शकतो.
साखर बेताबेताने घालावी कारण आंब्याचा रस आणि साखर वितळली कि चक्का थोडासा पातळ होतो .
वेळ :
३० मिनिटे , ५-६ व्यक्तीनसाठी .