कैरीचा मुरंबा /Mango Murabba
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/mango-murabba.html?m=0
वेळ :
३० मिनिटे , २ व्यक्तीन साठी .
साहित्य :
१)साधारण १ किलो मोठया कैऱ्या
२)१ ते सव्वा किलो साखर
३)१०-१२ वेलचींची पूड
४)५-६ लवंग
५)एक छोटी वाटी मिठ
६)हळद
७)३छोटे चमचे लाल तिखट
कृती:
कैरी चांगली धवून साले काढुन घ्यावी.
बारीक किसणीने छान कीस करून घ्यावे.
त्यात मिठ टाकुन साधारण ५-६ तास ठेवावे. म्हणजे छान पाणी सुटेल. ते पाणी तसेच त्यात राहू दयावे.
त्यात मिठ टाकुन साधारण ५-६ तास ठेवावे. म्हणजे छान पाणी सुटेल. ते पाणी तसेच त्यात राहू दयावे.
एक स्टीलच्या पातेल्यात वरील मिश्रण काढुन त्यात हळद व साखर घालवे व चांगले ढवळून घ्यावे.
या भांडयाला वरून छान पातळ स्वच्छ कापड लावावे.
साधारण ६-७ दिवस कडक ऊन्हात हे भांड ठेवावे.
मधल्या काळात म्हणजे साधारण २-३ दिवसातून एकदा छान ढवळून घ्यावे.
६ व्या दिवशी त्यात वेलची पुड, लवंग,व लाल तिखट घालावे आणि छान ढवळून घ्यावे.