ताकातली पालक भाजी - Takatli Palak Bhaji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/05/takatli-palak-bhaji.html?m=0
२० मिनिटे , २ व्यक्तीन साठी .
साहित्य :
१)१ जुडी पालक (बारीक चिरलेला)
२)२ कप घट्ट ताक
३)१/२ चमचा बेसन
४)१/२ वाटी शेंगदाणे
५)चवीपुरते मिठ
६)कोथिंबीर बारीक चिरून
७)हळद
फोडणीचे साहित्य:
१)१/२ टिस्पून तुप
२)मोहरी १/२ टिस्पून
३)जिरे १/२टिस्पून
४)चीमुठभर हिंग
५)४-५ कढीपत्त्याची पाने
६)हिरव्या मिरच्या ३-४
७)आल लसुन पेस्ट
कृती:
शेंगदाणे भिजत घालून कुकरमध्ये उकडून घ्यावे.
एका पातेल्यात तुप गरम करावे. त्यात मोहरी घालावी.
मोहरी तडतडली कि जिरे,हिंग व कढीपत्ता घालावा.
१/२ चमचा हळद,मिरच्या बारीक चिरून व आल लसुन पेस्ट घालावी.
शिजलेले शेंगदाणे फोडणीमध्ये घालून परतावे.
शेंगदाणे परतल्यावर लगेचच बारीक चिरलेला पालक घालावा व चांगला शिजवून घ्यावा.
पालक शिजल्यावर त्यात घट्ट ताक व बेसन एकत्र करून घालावे. उकळी येईपर्यंत ढवळत राहावे, म्हणजे ताक फुटत नाही.
चवीपुरते मिठ घालावे.