भरली वांगी | Bharli Vangi
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/bharli-vangi.html
४५ मिनिटे,
२ व्यक्तीन साठी.
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) ६-८ मध्यम आकाराची वांगी
२) १ मोठा कांदा
३) १/२ वाटी ओलं खोबर
४) ३-४ चमचे शेंगदाण्याचे कूट
५) २ छोटे चमचे मालवणी मसाला
६) १ छोटा चमचा पांढरे तिळ
७) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड
८) तेल
९) हळद
१०) कोथिंबीर
११) आवडीनुसार मिठ
कृती :
एका भांडयात थोडेसे तेल गरम करून त्यात कांदा लालसर भाजून घ्यावा.
त्यात ओलं खोबर घालून वाटण लालसर भाजून घ्यावे.
या वाटपात शेंगदाण्याच कूट, तिळ, जिरे व धणे पूड, मालवणी मसाला,बारीक चिरलेला कांदा व मिठ घालून सारण चांगले एकजीव करावे.
वांगी स्वच्छ धवून घ्यावी. देठांना जर काटे असतील तर काढून टाकावे.
वांग्यांना मधून चार काप दयावे. पूर्ण फोडी करू नये कारण त्यात सारण भरायचे आहे.
सारण वांग्यात भरावे.
एका भांडयात तेल गरम करावे. एक एक करून अलगदपणे सारण भरलेली वांगी घालावी.
थोडीशी लालसर भाजून घ्यावी. वरून सर्व उरलेल सारण घालून घ्यावे.
थोडेसे पाणी घालावे. मध्येमध्ये वांगी परतत राहावी.
मंद ग्यासवर शिजू दयावे.
वरून झाकण ठेवावे, या झाकणात थोडेसे पाणी घालवे म्हणजे वाफेने वांगी लवकर शिजतात.
हे पाणी वांग्यात घालावे.
वांगी शिजली कि वरून छान कोथिंबीर घालावी.
भरलेली वांगी चपाती किंवा भाकरी सोबत खाण्यास घ्यावी.