मसाला भात | Masala Bhat

Masala Bhat in English वेळ :   ३० मिनिटे, २ व्यक्तींसाठी. साहित्य : १) २ वाटया बासमती तांदूळ  २)  साडे ३ वा...


वेळ :  
३० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.

साहित्य :

१) २ वाटया बासमती तांदूळ 














२)  साडे ३ वाटया पाणी 
३)  हळद 
४)  १ वाटी बटाटयाच्या फोडी  
५)  १ वाटी फ्लॉवरचे तुकडे
६)  १ मध्यम आकाराचा कांदा
७)  १ बारीक चिरलेला टोम्याटो  
८)  १/२ वाटी हिरवे  वाटणे 
९)  २ छोटे चमचे आलं लसून पेस्ट 
१०) कोथिंबीर 
११)  २ छोटे चमचे गरम पूड 
१२) गोडा मसाला पूड
१३) २ चमचे तूप 
१४) १/२ वाटी ओंल खोबरं
१५) काजू 


फोडणीसाठी साहित्य:

१) १ छोटा चमचा मोहरी  
२) १ छोटा चमचा जिरे  
३) १ चिमुठ हिंग 
४) ७-८ कढीपत्त्याची पाने 





गोडा मसाला पूड साहित्य: 

१) २ तमाल पत्र  
२) १ काळी वेलची  
३) २-३ काळी मिरी 
४) १ दालचिनी 
५) २ लवंग  
६) २ छोटे चमचे धणे 
७) १ छोटा चमचा किसलेले सुखे खोबरे 
८) ३-४ लाल मिरच्या 

एका भांडयात वरील मसाले गरम करून घ्यावे एकदाका मसाल्याचा सुगंध आला की ग्यास वरून बाजूला करून  मिक्सर मध्ये बारीक पूड करून घ्यावी. 


कृती :

तांदूळ स्वच्छ धुवून पाणी काढून  ३० मिनिटे बाजूला करून ठेवावे. 


एका भांडयात तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्त्याची पाणे घालून छान फोडणी करून घ्यावी. 

मोहरी तडतडलीकी सर्व भाज्या घालाव्यात. 

हळद व थोडस  पाणी घालून १० मिनिट भाज्या उकडून घ्याव्यात. 

भाज्या अर्ध्या शिजल्याकी तांदूळ घालून फुडची ५ मिनिटे सतत ढवळत राहावे. 















तांदूळ थोडेसे परतून झाले की त्यात मिठ, तयार केलेला गोडा मसाला,गरम मसाला आणि गरम पाणी घालून झाकण लावून भात शिजू दयावा. 

एका भांडयात तूप गरम करून त्यात काजू थोडे लालसर तळून घ्यावे. 

थोडेसे काजू भातात घालावे. 

देताना वरून कोथिंबीर, ओंल खोबरं आणि तळलेले काजू घालून छान सजवून दयावा. 






Related

Rice 7040086253970446873

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item