केळ्याची भजी | Banana Bhajii
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/banana-bhajii.html?m=0
वेळ :
२०मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
१) २ मध्यम आकराची कच्ची केळी
२) १ वाटी चण्याच पिठ
३) १ चमचा तांदूळ पिठ
४) हळद
५) १/२ चमचा लाल तिखट
६) खाण्याचा सोडा १ चिमुठ
७) आवडीनुसार मिठ
८) तळणासाठी तेल
केळी सोलून त्याची काप करुण घ्यावी.
५-१० मिनिटे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावी.
चण्याच्या पिठात, तांदूळ पिठ ,मिठ,हळद,लाल तिखट घालून चांगल एकजीव कराव. वरून
खाण्याचा सोडा घालावा.
आवश्यक तेवढे पाणी घालावे. हे मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट आसू नये.
एका भांडयात तेल गरम करून घ्यावे.
पिठात एक एक काप घोळून तेलात सोडावे.
छान सोनेरी रंग येयीपर्यंत तळून घ्यावी.
गरमा गरम खावयास घ्यावीत.
हिरव्या चटणी सोबत छान लागतात.