ड्राय फ्रूट लाडू
Dry Fruit Laddus In English वेळ : १५ मिनिटे साहित्य : १ ) १ वाटि खजूर २ ) २ - ३ मोठे चमचे बदाम ३ ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/dry-fruit-laddus_27.html?m=0
वेळ:
१५
मिनिटे
साहित्य:
१) १ वाटि खजूर
२) २-३ मोठे चमचे बदाम
३) २-३ मोठे चमचे काजू
४) २-३ मोठे चमचे किसमिस (मनुका)
५) ६-७ सुके अंजीर
६) १ मोठा चमचा वेलची पूड
८) १ मोठा चमचा खोबर किस
खजुरातल्या बीया काढून सोलुन घ्या.
अंजीरही कुस्करून घ्या.
एका भांडयात बादाम चांगले खमंग भाजून घ्यावे.
मिक्सरला भाजलेले बदाम, सोलुन घेतलेले खजूर आणि अंजीर, काजू, किसमिस व खोबर किस घालून जाड़सर वाटून घ्यावे.
वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे.
या मिश्रणाचे छान लाडू वळून घ्यावे.