घेवडयाची भाजी | Ghewadyachi Bhaji (Green Beans)
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/ghewadyachi-bhaji-green-beans_14.html?m=0
वेळ:
२० मिनिटे
साहित्य:
१) पाव किलो घेवडा
२) १ बारिक चिरलेला कांदा
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा मोहरी
५) कढीपत्त्याची पाने
७) २ चमचे तेल
८) कोथिंबीर
९) मीठ चवीनुसार
कृती :
घेवडा साफ करून बारिक चिरून घ्यावा.
एका भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.
मोहरी तडतडली कि जिरे व कढीपत्ता घालावा.
बारिक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावे.
कांदा झाला कि लगेचच चिरलेला घेवडा घालून चांगले परतावे.
हळद, मीठ व मालवणी मसाला घालावा.
थोडासा पाण्याचा हपका मारून बारिक ग्यासवर झाकण लावून शिजू दयावी.
वरून कोथिंबीर घालावी व गरम गरम पोळी सोबत खावयास दयावी.
Nice
ReplyDeleteIt's tasty😄😄