घेवडयाची भाजी | Ghewadyachi Bhaji (Green Beans)


वेळ:

२० मिनिटे

साहित्य:

१) पाव किलो घेवडा
२) १ बारिक चिरलेला कांदा
३) १  छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा मोहरी
५) कढीपत्त्याची पाने
६) २ छोटे चमचे मालवणी मसाला
७) २ चमचे  तेल
८) कोथिंबीर
९) मीठ चवीनुसार


कृती :

घेवडा साफ करून बारिक चिरून घ्यावा.




एका भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.

मोहरी तडतडली कि जिरे व कढीपत्ता घालावा.

बारिक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावे.



कांदा झाला कि लगेचच चिरलेला घेवडा घालून चांगले परतावे.

हळद, मीठ व मालवणी मसाला घालावा.

थोडासा पाण्याचा हपका मारून बारिक ग्यासवर झाकण लावून शिजू दयावी.



वरून कोथिंबीर घालावी व गरम गरम पोळी सोबत खावयास दयावी.







Related

Vegetables 1988809093001460479

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item