कारल्याची भाजी | Karlyachi Bhaji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/karlyachi-bhaji.html?m=0
वेळ :
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)३-४ कारली
२)२ चमचे लाल तिकट
३)१छोटा चमचा धणे पूड
४)हळद
५)तांदुळाचे पिठ १/२ वाटी
६)तेल तळण्यासाठी
७)आवडीनुसार मीठ
कृती :
कारली सोलुन बारीक चिरून मिठ लावून चांगली चुरून घ्यावी.
थोडया वेळाने मसाला, धणे पुड,हळद लावून घ्यावे.
यामध्ये तांदुळाचे पिठ घालून छान तेलामध्ये तळून घ्यावे.
तेल कमी घालुन मंद आचेवर तळावेत छान कुरकुरीत होतात.