कोबी वटाणा भाजी | Kobi Vatana Bhaji

https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/kobi-vatana-bhaji.html
वेळ:
साहित्य:
१) पाव किलो पत्ता कोबी
२) दीड वाटी हिरवे वाटणे
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा मोहरी
५) कढीपत्त्याची पाने
६) लाल तिखट
७) १ चमचा तेल
८) कोथिंबीर
९) मीठ चवीनुसार
कृती :
एका भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.
मोहरी तडतडली कि जिरे व कढीपत्ता घालावा.
हळद लाल तिखट घालून थोडेसे परतावे.
थोडासा पाण्याचा हपका मारून बारिक ग्यासवर झाकण लावून शिजू दयावी.