कोथिंबीर झुणका | Kothimbir Zunka
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/kothimbir-zunka.html?m=0
वेळ :
१५मिनिटे
२व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १ कप बेसण
१) १ कप बेसण
२) १ कप पाणी
३) १ कप चिरलेली कोथिंबीर
४) १ बारिक चिरलेला कांदा
५) ७-८ ठेचलेली लसून
६) तेल
७) १ छोटा चमचा मोहरी
८) १ छोटा चमचा जिरे
९) कढीपत्त्याची पाने
१०) ५-६ हिरव्या मिरच्या
११) मिठ चविनुसार
एका कढईत तेल गरम करून त्यात प्रथम ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून लालसर तळून घ्याव्यात.
आता त्यात मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,बारिक चिरलेला कांदा घालून लालसर भाजून घ्यावा.
कांदा लालसर झाला कि बारिक चिरलेलि कोथिंबीर घालून चांगले ढवळून घ्यावे.
बेसण एका भांडयात घेवून त्यात पाणी घालून बेसनाच्या गुठळ्या मोडून घ्याव्या.
हे बेसण वरील मिश्रणात घालावे.
चांगले ढवळून घ्यावे
म्हणजे गुठळ्या होणार नाही.
झाकण लावून ५ मिनिटे बारिक ग्यासवर शिजू दयावे.
गरम गरम पोळीसोबत खावयास दयावे.