Potato Sheera | बटाटयाचा शिरा
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/potato-sheera.html
Potato Sheera recipe in Marathi. Explore ingredients & share your experience for maharashtrian recipe Potato Sheera.
वेळ:
वेळ:
२५ मिनिटे
२ जणांसाठी.
साहित्य:
४ बटाटे
१/२ वाटी साजूक तूप
१ वाटी साखर
बदाम आवडीनुसार
काजू आवडीनुसार
कृती:
बटाटे उकडून घ्यावेत.
उकडलेल्या बटाटयाची सालं काढून घ्यावी.
चांगले कुस्करून घ्यावे.
एका भांडयात तूप गरम करून घ्यावे. त्यात बटाटयाचा लगदा टाकावा.
लगदा गुलाबी होईपर्यंत भाजावा.
तूप सुटू लागल्यावर साखर घालावी.
थोडावेळ परतून घ्यावे.
नंतर बदाम व काजूचे काप घालून परतावे.
गरम गरम खाण्यास घ्यावे.