Ratalyacha Halwa | रताळ्याचा हलवा

In English : Ratalyacha Halwa | Sweet Potato Halwa


वेळ:  

२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी 

साहित्य:

१)  २ मध्यम आकाराची रताळी  
२)  २ चमचे तूप
३)  १ छोटा चमचा वेलची पूड   
४)  अर्धी वाटी साखर 
५) १/२ वाटी शेंगदाण्याच कुट 
६) बदाम आवडीनुसार 




कृती :


रताळी चांगली धुवून त्यांची साल काढून घ्यावी.





सोलुन  घेतलेली  रताळी किसून घ्यावी.

किसताना पाण्यात किसावी म्हणजे काळी पडत नाही. 






एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करून त्यात रताळ्याचे कीस चांगले परतून घ्यावे. 







किसाचा रंग थोडासा बदलू लागला कि शेंगदाण्याचे कुट त्यात घालून परतावे. 



सतत परतत राहावे.  भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. 



रताळे शिजले कि त्यात साखर, वेलची पूड व बदामचे काप घालावे. 







५ मिनिटे मंद ग्यासवर  छान साखर वितळू दयावी. 



गरम किंवा थंड कसाही खाता येतो.








Related

Navratri 1555683609409949368

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item