वडा भात | Vada Bhat


वेळ :  

२० मिनिटे 
२ व्यक्तींसाठी 


वाड्याचे साहित्य:

१) १/२ कप चना डाळ 
२) २-३ चमचे मटकी डाळ 
३) २ चमचे उरडाची डाळ  
४) २ चमचे तूर डाळ 
५) २ चमचे मसूर डाळ     
६) २ चमचे मुंग डाळ  
७) ७-८ लसणाच्या पाकळ्या 
८) हळद 
९)  ७-८ हिरव्या मिरच्या 
१०) कोथिंबीर 
१०) जिरे 
११) मिठ चविनुसार 

भाताचे साहित्य : 

१) १ कप बासमती तांदूळ  
२) दीड कप पाणी
३) मिठ  चविनुसार 

फोडणीचे साहित्य : 

१) तेल 
२) १/२ चमचा जिरे 
३) १/२ चमचा मोहरी 
४) एक चिमुठ हिंग 
५) २ अख्या लाल मिरच्या  

वड्याची कृती :

सगळ्या डाळी एकत्र धुवून ३ तास भिजू घालाव्यात. 


३ तासाने पाणी काढून त्यात हिरव्या मिरच्या, लसुन पाकळ्या , कोथिंबीर व मिठ घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे. 

वाटताना पाणी घालू नये. 

वरील मिश्रणात  जिर घालून घ्यावे . 

एका कढईत तेल गरम करून वरील मिश्रणाचे वडे करून घ्यावे. 



भाताची कृती :

तांदूळ धुवून घ्यावे.  पाणी व मिठ घालून कुकरला ३ शिट्या काढाव्यात. 


फोडीची कृती:

एका छोटया कढईत फोडणीसाठी तेल गरम करावे त्यात मोहरी घालावी ती तडतडली कि हिंग कढीपत्ता व जिरे घालावे  थोडसे भाजले कि लाल मिरच्या तोडून घालाव्यात. 

मिरच्या लालसर झाल्या कि ग्यास बंद करावा. 


वाढणीसाठी :

ताटात आधी भात घ्यावा  त्यावर ३-४ वडे घालावे. 

हे वडे कुस्करून भातात घालावे व वरून तयार फोडणी घालावी. 

खातान  लाल मिरची आणि वडे भातात छान कुस्करावे आणि खायला घ्यावे. 






Related

Rice 23423006416107638

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item