डाळ पालक भाजी
पालकाची पातळ भाजी Dal Palak Bhaji in English वेळ : २५ मिनिटे २ व्यक्तींसाठी . साहित्य: १ ) १ जुडी पालक २ ) २...

पालकाची पातळ भाजी
Dal Palak Bhaji in English
कृती:
तुरिची डाळ व शेंगदाणे प्रेशर कूकरला लावून साधारण ३ शिट्ट्या काढाव्या.
पालक धुवून चिरून घ्या
कांदा, टोमॅटो व हिरवी मिरची बारिक चिरून घ्या.
तुरीची डाळ चमच्याने ढवळून छान घोटून घ्या.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हींग, कढीपत्ता, आंल लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या व बारिक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या.
कांदा लालसर होईस्तोवर भाजून घ्या.
आता बारिक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत भाजा.
पालक शिजला की घोटलेली डाळ त्यावर घाला.
मीठ घालून ढवळून घ्या.
उकळी आली की मंद ग्यासवर ५ मिनिटे शिजू दया.
एका छोटया कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात लाल तिखट घालून डाळीला फोडणी दयावी.
वरुन कोथिंबीर घालून गरमच चपाती सोबत दयावी.