Masala Doodh | मसाला दूध
Masala Doodh in English वेळ: १० मिनिटे साहित्य: १) १ लिटर दूध २) १/२ कप साखर ३) २ छोटे चमचे वेलची पूड ४) ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/10/masala-doodh_7.html?m=0
वेळ:
१० मिनिटे
साहित्य:
१० मिनिटे
साहित्य:
१) १ लिटर दूध
२) १/२ कप साखर
३) २ छोटे चमचे वेलची पूड
४) १/२ छोटे चमचे जायफळ पूड
५) ४-५ मोठे चमचे बदाम
६) ४-५ मोठे चमचे पिस्ता
७) २ मोठे चमचे चारोळी
८) १ छोटा चमचा केसर
मसाला कृती:
एका कढईत बदाम व पिस्ता थोडेसे गरम करून घ्या.
बदाम, पिस्ता, केसर, वेलची पूड, जयफळ पूड एकत्र करून मिक्सला लावून बारीक़ पूड करून घ्या.
मसाला दूध कृती:
एका कढईत मंद ग्यासवर दूध गरम करत ठेवावे.
एक सारखे ढवळत रहा.
थोडयावेळ उकळी येवू दया.
दूध थोडेसे अटले की त्यात साखर घाला.
साखर विरघळली की वटलेला मसाला घाला.
ढवळून घ्या.
वरुन चारोळी घालून गरमच सर्व्ह करा.