वऱ्हाडी खिचडी | Varhadi Khichadi
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/10/varhadi-khichadi.html?m=0
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
खिचडीचे साहित्य :
१) २ वाटया तांदूळ
२) १ वाटी तुरीची डाळ
३) ५-६ लसुन पाकळ्या
४) १ वटी तेल
५) १/२ छोटा चमचा हळद
६) मीठ चवीनुसार
७) कोथिंबीर
फोडणीचे साहित्य :
१) १/२ चमचा मोहरी
२) १/२ चमचा जिरे
३) २ चिमूठ हींग
४) लाल तिखट मिरच्या
५) ४-५ बारीक़ चिरलेल्या लसुन पाकळ्या
६) तळलेला पापड
कृती :
तांदुळ व डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या.
६ वाटया पानी गरम करावे त्यात हळद, मीठ व ठेचलेला लसुन घाला.
पाण्याला उकळी आली की लगेचच तांदुळ डाळ घालून प्रेशर कुकरला लावून खिचड़ी शिजवून घ्या.
हींग व बारीक़ चिरलेल्या लसुन पाकळ्या घाला व छान लालसर झाल्या की मिरची घालून कुरकुरित तळुन घ्या.
खावयास देताना खिचडीवर फोडणी घालून छान मिरच्या कुस्करून घ्या.