अळीवाचे लाडू
AlivacheLadoo in English वेळ : २० मिनिटे साहित्य : १ ) साधारण १ / २ कप अळीव २ ) २ कप ओल खोबर ३ ) १ क...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/alivache-ladoo_27.html?m=0
२० मिनिटे
साहित्य:
१) साधारण १/२ कप अळीव
२) २ कप ओल खोबर
३) १ कप गुळ
४) १० बदाम बारीक़ चिरलेले किंवा जाडसर पूड करून
५ ) काजू आवडीनुसार बारीक़ किंवा जाडसर पूड करून
६) २ मोठे चमचे मनुका
७) १/२ छोटा चमचा वेलची पूड
कृती:
अळीव नारळाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात २ तास भिजवून ठेवावे.
एका जाड बुडाच्या भांड्यात खवलेले खोबरे, गुळ एकत्र करून मंद ग्यासवर १-२ मिनिटे ढवळावे.
मिश्रण भांड्याला खाली लागणार नाही याची काळजी घ्या.
आता भिजवलेला अळीव घालावा.
अळीव घातल्यावर हे मिश्रण पातळ होईल.
लगेचच काजू पूड, बदाम पूड व वेलची पूड घालून परतत रहा.
हळूहळू मिश्रण घट्ट होईल.
मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण ग्यासवर परतत राहावे.
नाहीतर लाडू वळता येत नाही.
गोळा झाला की मिश्रण ग्यासवरुन बाजूला करून थंड होवू दयावे.
थंड झाले की लगेचच मध्यम आकराचे लाडू वळून घ्या.