खोबऱ्याचे लाडू
Coconut Laddoos in English वेळ : ३० मिनिटे साहित्य : १ ) ३ कप खोबरा किस २ ) दीड कप साखर ३...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/coconut-laddoos_14.html?m=0
साहित्य:
१) ३ कप खोबरा किस
२) दीड कप साखर
३) १ कप पाणी
४) २ छोटे चमचे तूप
५) १/४ छोटा चमचा वेलची पूड
कृती:
एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात खोबर घालून थोडस परतून घ्या.
एका प्लेटमध्ये काढून बाजूला करून ठेवा .
साखरेचा एक तारी पाक बनवून घ्या.
एका भांड्यात पाणी घेवून त्यात साखर घालून गरम करत ठेवा.
साखर वितळली की ग्यास मध्यम करून साखरेचा एक तारी पाक बनवून घ्या.
लगेचच खोबर व वेलची पूड घालून ढवळा.
मिश्रण घट्ट होवू लागेल साधारण ७-८ मिनिटानी ते भांड्याच्या बाजूनी सुटू लागले की लगेचच ग्यास बंद करून बाजूला करून ठेवा.
एकदाका मिश्रण थंड झाले की दोन्ही हाथावर तूप लावून छोटे छोटे लाडू वळून घ्या.