लसूण मेथी भात
Lasun Methi Bhat in English वेळ : २० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) २ कप बासमती तांदूळ २ ) सा...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/lasun-methi-bhat.html?m=0
वेळ:
२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) २ कप बासमती तांदूळ
२) साडे तीन कप पाणी
३) हळद
४) २ कप बारिक चिरलेली हिरवी मेथी
५) १ मध्यम आकाराचा कांदा
६) ८-१० लसूण पाकळ्या
७) मीठ गरजेनुसार
फोडणीसाठी:
१) १ छोटा चमचा मोहरी
२) १ छोटा चमचा जिरे
३) १ चिमुठभर हींग
४) ७-८ कढीपत्त्याची पाने
५) ३ मोठे चमचे तेल
मसाले:
१) १/४ छोटा चमचा लाल मिरची पूड
२) १/४ छोटा चमचा गरम मसाला पूड़
३) १/२ छोटा चमचा जिरे पूड
४) १ छोटा चमचा धणे पूड
५) चिमुठभर हींग
कृती:
तांदूळ धुवून पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवावे.
पाणी उकळत ठेवावे, उकळी आली की लगेचच मीठ व भिजवलेले तांदुळ घालून मोकळा भात बनवून ठेवावा.
एका जाड़ बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली की लगेचच जिरे, हिंग व कढीपत्त्याची पाने घालावी.
लगेचच उभा चिरलेला कांदा व लसणाच्या बारीक़ चिरलेल्या पाकळ्या घालून लाल होईपर्यंत परताव्या.
कांदा परतून झाला की बारिक चिरलेली मेथी घालून तेल सुटेपर्यंत परतावी.
शिजवलेला भात घालून परतावे.
झाकण ठेवून १० मिनिटे मंद ग्यासवर भात शिजू दयावा.
सर्विंग बाउल मध्ये शिजलेला भात काढून घ्या त्यावर कोथिंबीर गरमच कोशिंबीरीसोबत सर्व्ह
करा.