शेव भाजी
Shev Bhaji in English वेळ : ३० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) दीड वाटी जाड तिखट शेव २ ) १ मध्यम ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/shev-bhaji_22.html?m=0
Shev Bhaji in English
३० मिनिटे,
साहित्य:
१) दीड वाटी जाड तिखट शेव
१) ८-१० लसणाच्या पाकळ्या
१) १/२ वाटी सुख खोबर
वेळ:
३० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) दीड वाटी जाड तिखट शेव
२) १ मध्यम आकाराचा कांदा
३) १ टोमॅटो
४) तेल १/२ वाटी
आंल लसूण पेस्ट:
१) ८-१० लसणाच्या पाकळ्या
२) १ इंच आंल
३) कोथिंबीर
खडा मसाला
१) १/२ वाटी सुख खोबर
२) १ छोटा चमचा खसखस
३) १ चक्रीफूल
४) १/२ चमचा जिरे
५) छोटी काडी दालचीनी
६) ४-५ मिरी
७) १ तमालपत्र
८) १ मोठी इलायची
९) २-३ हिरवी इलायची
१०) ३-४ लवंग
मसाला पूड
१) १/२ चमचा हळद
२) १/२ चमचा धने पूड
३) १/२ चमचा जीरे पूड
४) लाल मिरची पूड
इतर :
१) पाणी आवश्यकतेनुसार
२) कोथिंबीर बारीक़ चिरलेली
३) मीठ चविनुसार
कृती:
प्रथम मसाला करून ठेवावा.
साधारण १ छोटा चमचा तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घ्यावा.
कांदा झाला की लगेचच खडा मसाल्याचे साहित्य घालून घ्या फक्त सुख खोबर सर्वात शेवटी घालावे म्हणजे ते करपणार नाही.
हा मसाला एकदा थंड झाला की लगेचच मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्यावी.
आंल, लसूण व कोथिंबीर एकत्र करून त्याची सुद्धा पेस्ट करून घ्या.
टोमॅटो बारीक़ चिरून त्याचीही मिक्सरला लावून प्यूरी बनवून घ्या.
आता कढईत उरलेल तेल गरम करून त्यात प्रथम खडा मसाला पेस्ट घालवी चांगली परतावी कढईला खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
तेल सुटु लागले की आंल लसणाची पेस्ट घालून १-२ मिनिटे परतवी.
लगेचच टोमॅटो प्यूरी व वर दिलेल्या सर्व मसाला पूड घालून तेल सुटे पर्यंत परतावा.
आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगली उकळी येवू दयावी.
मसाला चांगला उकळला की वरुन शेव व बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालावी.
शक्यतो खानाच्या वेळेस घालावे म्हणजे जास्त नरम पडणार नाही.