Bhendichi Amti । भेंडीची आमटी
Bhendichi Amti in english वेळ : २० मिनिटे २ व्यक्तींसाठी. साहित्य: १ ) १०-१२ भेंडी २) १ कांदा ३) १/२ वाटी ओलं खो...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/bhindichi-amti_17.html?m=0
२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १०-१२ भेंडी
२) १ कांदा
३) १/२ वाटी ओलं खोबर
४) ५-६ लसणाच्या पाकळ्या
५) २ टोमॅटो
६) कोथिंबीर
७) २ छोटे चमचे लाल मिरची पूड
८) हळद
९) धणे पूड
१०) तेल फोडणीसाठी
११)मीठ
१०) तेल फोडणीसाठी
११)मीठ
कृती:
वाटण बनवण्यासाठी:
कांदा व टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावे.
मिक्सरच्या भांडयात ओलं खोबर, धणे पूड, लाल मिरची पूड, हळद व कांदा टोमॅटोचे तुकडे सर्व एकत्र करून छान वाटण करून घ्यावे.
भेंडी धुवून स्वच्छ कपडयाने फुसुन घ्यावी.
भेंडीच्या दोन्ही बाजू कापून मधून चिरून दोन भाग करून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करून त्यात ठेचलेली लसूण घालून थोडीशी लालसर होईपर्यंत परतावी.
चिरलेली भेंडी लसणावर घालून थोडीशी लालसर परतून घ्यावी.
वर करून ठेवलेल वाटण भेंडीवर घालावे.
चमचाने ढवळून तेल सुटेपर्यंत परतावे. वरुन आवश्यक पाणी घालून आमटी करावी.
मीठ घालून छान उकळी येवू दयावी.
वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालून गरमच भातासोबत सर्व्ह करावी.