Kulathache Pithle | कुळीथाचे पिठले
Kulathache Pithle in English वेळ : १५ मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) १ / २ वाटी कुळीथ पिठ २ ) १...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/kulathache-pithle_23.html?m=0
वेळ:
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १/२ वाटी कुळीथ पिठ
२) १/२ वाटी बारिक चिरलेला कांदा
३) ३-४ लसणाच्या पाकळ्या
४) २-३ कोकम
५) २ वाटया पाणी
६) २ बारिक चिरलेल्या मिरच्या
६) २ बारिक चिरलेल्या मिरच्या
७) ४-५ कढीपत्त्याची पाने
८) १/२ छोटा चमचा जिरे
९) चिमुठभर हींग
१०) १ छोटा चमचा मालवणी मसाला
११) तेल
१२) मीठ
१३) कोथिंबीर
१४) २ मोठे चमचे खोबर
कृती:
एका भांडयात कुळीथ पिठ घेवून त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याचे मिश्रण बनवून बाजूला करून ठेवा.
आता कढईत तेल गरम करून त्यात प्रथम जिरे, कढीपत्त्याची पाने व हिरव्या मिरच्या घालून २ मिनिटे परतावे.
त्यावर बारिक चिरलेला कांदा व लसूण घालावा व तेल सुटू लागले की २ वाटया पाणी, मालवणी मसाला, मीठ व कोकम घालावे.
पाण्याला उकळी आली की लगेचच वरील कुळीथ पीठाचे मिश्रण घालावे व चांगले ढवळून घ्यावे आवश्यक वाटल्यास पाणी घालू शकता.
आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता.
वरुन खोबर घालावे.
बारिक चिरलेली कोथिंबीर घालून गरम भातासोबत वाढावी.
टिप:
तुम्ही ओल खोबऱ्या ऐवजी खोबऱ्याच तेल ही वापरु शकता त्याची चव वेगळी व छान लगते .