Radish Dal । मुळ्याचे वरण
Radish Dal in English वेळ : २० मिनिटे २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) १ छोटा मुळा २ ) १ / २ वाटी तुरीची डा...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/12/radish-dal_16.html
२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १ छोटा मुळा
२) १/२ वाटी तुरीची डाळ
३) आंल लसुण पेस्ट
४) कोथिंबीर
६) हळद
७) २-३ कोकम
८) मीठ
फोडणीसाठी लागणार साहित्य :
१) १/२ छोटा चमचा मोहरी
२) १/२ छोटा चमचा जिरे
३) चिमुठभर हींग
४) कढीपत्त्याची पाने
कृती:
डाळ व मुळ्याचे तुकडे प्रेशर कुकरला लावून साधारण ३ शिट्ट्या करून उकडून घ्यावी.
चमच्याने डाळ चांगली घोटून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला मोहरी तडतडली की जिरे, हींग, कढीपत्त्याची पाने व आंल लसून पेस्ट घालून १-२ मिनिटे फोडणी चांगली परतून घ्या.
आता शिजवून घेतलेली डाळ व मुळ्याचे तूकडे वरील फोडणीवर घालून घ्या थोडस परतून, मीठ, मालवणी मसाला, कोकम व थोडेसे पाणी घालून उकळी आणावी.
बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालून गरमच भातासोबत वाढावी.