Almond Halwa Modak | बदाम हलव्याचे उकडीचे मोदक
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/badam-halwyache-ukadiche-modak_7.html
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
नग : ११-१२.
सारणासाठी लागणारे साहित्य:
१) १४ -१५ बदाम
२) १/२ कप दूध
३) १/२ कप तूप
४) १/२ छोटा चमचा वेलची पूड
५) १/२ छोटा चमचा जायफळ पूड
उकड बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) १ कप तांदळाचे पीठ
२) १ कप पाणी
३) चिमुठभर मीठ
४) १ छोटा चमचा तूप
उकड बनवण्याची कृती:
तांदूळाची उकड करण्यासाठी २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी
घ्यावे.
जाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे.
गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे.
गॅस वरुन बाजूला करून झाकण ठेवून १० मिनिटे वाफ त्यात मुरु दयावी.
सारण कृती:
बदाम कोमट पाण्यात १/२ तास भिजू घालावे.
बदामाची सालं काढून घ्यावी.
मिक्सरला बदाम व ४ चमचे दूध एकत्र करून छान पेस्ट करून घ्यावी.
एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे.
गरम तुपावर बदामाची पेस्ट घालून मंद ग्यासवर लालसर भाजून घ्यावी.
सतत ढवळत राहावे भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.
थोडेसे दूध व पाणी बदामाच्या मिश्रणात घालून ढवळावे.
पाणी व दूध सुकले की साखर घालावी.
मोदक बनवण्याची कृती:
एका ताटात तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून
घ्यावी.
त्यासाठी बाजूला पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर
मळून घ्यावी.
मळून घ्यावी.
उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी हाथावर तयार करावी.त्यात सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर हळदीची पान जर मिळाली तर ठेवावीत, त्यावर मोदक ठेवावेत.
वरून झाकण लावून १० मिनीटे वाफ काढावी.
वरून तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
Almomd Halwa Modak is sacrament specialy for Ganesh / sankshat Chhaturthi. Modak is a sweet dumpling stuffed with a filling of almonds paste.
Labels:
Sweet Dumplings, Marathi Modak, Ganapati Naivadya Sweet Coconut, Steamed Dumpling, Ganesh Chaturthi, Ganeshostav, Naivedyam, Indian Food, Indian Sweets,microwave oven