Kandyachi Pat ghalun Takach Besan | कांदयाची पात घालून ताकाच बेसण



वेळ:

२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:

१) १ कप बारिक चिरलेला पातीचा कांदा
२) १ कप बेसण 
३) हळद 
४) मीठ चवीनुसार 
५) ४-५ हिरव्या मिरच्या 
६) ५-६ लसूण पाकळ्या 
७) १/२ छोटा चमचा जिरे 
८) १/२ छोटा चमचा मोहरी 
९) कढीपत्त्याची पाने 
१०) कोथिंबीर 
११) १ कप दह्याचे ताक 
१२ ) तेल 


कृती:

एका जाड बुडाच्या भांडयात तेल गरम करावे. 

तेल झाले की त्यात मोहरी टाकावी ती तडतडली की जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालाव्यात. 

मिरच्या परतून झाल्या की बारिक चिरलेली कांदयाची पात घालावि व परतावे. 

५ मिनिटे झाकण ठेवून मंद ग्यासवर ठेवावे.   

आवश्यक वाटल्यास थोडेसे पाणी घालावे ( हपका  मारावा). 

एका भांडयात बेसण व ताक एकत्र करून बेसनातल्या सर्व गुठळ्या काढाव्यात.  

हे मिश्रण वरील कांदयावर घालावे, ढवळावे व गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.  

ग्यास मंद करून झाकण ठेवावे व ५ मिनिटे  शिजू दयावे. 

गरमच चपाती किंवा भाकरी सोबत खवायास दयावे.  



Labels:
Maharashtrian Pithle, Pithle Recipe, Pithala Recipe, Pithla Recipe,curd, green onion, gram flour,mixer,cookware,
cookware sets

Related

Vegetables 3056513673892476154

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item