Mix Vegetables Cutlet | मिश्र भाज्यांची पौष्टिक वडी
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/mix-vegetables-cutlet.html?m=0
वेळ:
२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) १ कप बारिक चिरलेली कोथिंबीर
१) १ कप बारिक चिरलेली कोथिंबीर
२) १ कप बारिक चिरलेल्या हिरव्या कांद्याची पात
३) १ कप बारिक चिरलेली हिरवी मेथी
४) १ कप किसलेला कोबी
५) १ कप बेसण
६) १ छोटा चमचा तांदूळ पीठ
७) २ हिरव्या मिरच्या
८) १ चमचा आल लसूण पेस्ट
९) २ छोटे चमचे जिरे
१०) १ छोटा चमचा पांढरे तिळ
११) १ छोटा चमचा लाल मिरची पूड
१२) तेल
१३) १/२ छोटा चमचा लिंबू रस
१४) मीठ
कृती:
सर्व भाज्या बारिक चिरून एकत्र कराव्या त्यात हिरव्या मिरच्या, आल लसूण पेस्ट, जिरे, तिळ, लाल मिरची पूड, लिंबू रस, मीठ, बेसण व तांदूळ पीठ घालून मिक्स करून घ्या .
थोडेसे पाणी घालून पीठ तयार करून घ्यावे.
एका प्लेटला तेल लावून हे मिश्रण थोडस जाडसर पसरून घ्यावे.
ढोकळा पत्रातसुद्धा छान होतात. थंड झाल्यावर तुकडे पाडुन छान
गरम तेलात कुकुरीत तळून घ्यावे किंवा शालो फ्राय करून घ्यावे.
वरून छान खोबर घालून हिरव्या चटणीसोबत खावयास दयावी.