Spinach Dhirde | पालकाचे धिरडे
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/spinach-dhirde_5.html
Spincah Dhirde ( Maharashtrian Pancakes) is a delicious maharashtrian recipe served as a Breakfast.
SpinachDhirde in English
वेळ :
२० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) ३ वाटया बेसण
२) २ कांदे बारीक़ चिरून
३) २ वाटया बारीक़ चिरलेला पालक
४) १ छोटा चमचा लाल मिरची पूड
५) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड
६) ३ मोठे चमचे तेल
७) हळद
८) मीठ चवीनुसार
कृती:
एका भांडयात बारीक चिरलेला पालक, कांदा, लाल मिरची पूड, जिरे व धणे पूड, हळद व मीठ घालून घ्यावे.
बेसण व आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर पीठ बनवावे.
जास्त पातळ करू नये .
नॉन स्टिक तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर तयार पीठ चमच्याने मधोमध घालावे व गोलाकार चमच्याने पसरावे.
ग्यास मंद करून बाजूने थोडेसे तेल घालून झाकण ठेवून २-३ मिनिटे ठेवावे.
एका बाजूने झाले की लगेचच परतून दुसऱ्या बाजूने होवू दयावे .
कालत्याने परतून थोडेसे प्रेस करावे .
गरम गरम टोमॅटो कैचअप किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्यास घ्यावी.
Labels:
dhirade recipe,dhirde recipe,recipes,spinach,pancakes, maharashtrian dhirde,non stick cookware