Coconut Vermicelli Kheer | खोबर शेवया खिर

Coconut Vermicelli Kheer in English: वेळ:   ३० मिनिटे, २ व्यक्तींसाठी. साहित्य: १) १ वाटी  शेवया २) १/२ छोटा च...

Coconut Vermicelli Kheer in English:वेळ:  
३० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:

१) १ वाटी  शेवया
२) १/२ छोटा चमचा तूप 
३) ३ वाटया पाणी 
४)  १/४ वाटी किसलेला गूळ 
५) १ वाटी ओले खोबरे 
६) १/२ छोटा चमचा वेलची पुड 
७) ४-५ बदाम,काजू  पिस्ता प्रत्येकी.

कृती:

एका पातेल्यात तुप वितळेपर्यंत गरम करावे. त्यात शेवया घालुन छान गुलाबी होयीस्तोवर भाजुन 
घ्याव्यात.

लालसर भाजू नयेत.

भाजुन झालेल्या शेवया बाजुला काढुन ठेवाव्यात.

पातेल्यात पाणी गरम करुन घ्यावे. 

बदाम, काजू व पिस्ताचे पातळ काप करून घ्यावे.

वेलचीची पुड करुन ती घालावी. 

एक उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया, ओले खोबरे व  गूळ घालावा . आवश्यक वाटल्यास  झाकण ठेवुन शेवया शिजू द्याव्यात.
शेवया शिजल्यावर ग्यास वरून बाजूला करुन बदाम ,काजू व पिस्ता घालावा.

हि खीर गरम वा थंड आवडीनुसार खाता येते.

 
Related

Sweets 959835671141984682

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item