Mix Sprouts Rice | मिश्र कढधान्याचा भात
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/mix-sprouts-rice.html?m=0
मोड काढलेले कढधान्य अतिशय पौष्टिक व कोणालाही आवडतील अशी.
लहान मुले मात्र कढधान्य खाण्यासाठी नेहमी कंटाळा करतात अश्यावेळी जर त्यांना अश्याप्रकारे भात बनवून दिला की बच्चे पार्टी एकदम मजेने खातात.
वेळ:
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे,
बनवण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) १ १/४ वाटी बासमती तांदुळ
२) २ छोटे चमचे तूप
३) १ छोटे चमचे जिरे
४) २-३ लवंग
५) १ दालचिनीची काडी
६) २ तमालपत्र
७) २ वेलची
८) १/४ छोटा चमचा हळद
९) मीठ चवीनुसार
९) मीठ चवीनुसार
कढधान्य व मिश्र भाज्यांसाठी लागणारे साहित्य:
१) १ वाटी उकडलेले कढधान्य
२) १/२ वाटी बारीक चिरून घेतलेल्या भाज्या
३) १ मोठा चमचा तूप
४) १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
५) १ छोटा चमचा आंल लसूण पेस्ट
६)१/२ छोटा चमचा लाल मिरची पूड
७) १ छोटा चमचा पाव भाजी मसाला
८) १/२ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
९) कोथिंबीर
१०) मीठ चवीनुसार
भात:
कुकरमध्ये पाणी गरम करावे त्यात तूप, जिरे, लवंग, दालचीनी, तमालपत्र, हळद, व वेलची घालून मध्यम आचेवर पाण्याला उकळी येवू दयावी.
पाण्याला उकळी आली की तांदूळ घालून २ मिनिटे परतावे.
मीठ व २ १/२ वाटी घालून कुकरचे झकण लावून २ शिट्ट्या काढाव्यात.
कूकर थंड झाला की झाकण काढून भात काढून मोकळा करून घ्यावा व बाजूला करून ठेवावा.
कढधान्य व मिश्र भाज्यां:
एका भांडयात तूप गरम करावे त्यात बारिक चिरलेला कांदा २ मिनिटे परतावा.
कांदा झाला की लगेचच त्यावर आंल लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, पाव भाजी मसाला व २ मोठे चमचे पाणी घालून मध्यम आचेवर १ मिनिट परतावे.
बारीक चिरलेला टोमॅटो व भाज्या घालून २ मिनिटे परतावे.
आता उकडून घेतलेली कढधान्ये घालून शिजू दयावे.
मीठ व कोथिंबीर घालून घ्यावी.
भात बनविण्याची कृती:
कढधान्ये झाली की लगेचच बनवून ठेवलेला भात घालून हलक्या हाथाने परतावे.
भाताची शिते परतत असताना तुटणार नाही याची काळजी घ्यावी व १ मिनिट मध्यम आचेवर झाकण लावून ठेवावे
एका बाउलमध्ये काढून कोशिंबीरी सोबत सर्व्ह करावा.
टिप:
हा भात बनवताना तुम्ही रात्रीचा उरलेला भातही वापरु शकता.
तुम्ही आवडीनुसार कुठलीही भाजी व कढधान्य वापरु शकता.
कढधान्य जास्त उकडू नये नाहीतर त्याची चव व त्यातील जीवनसत्व दोन्हीही निघून जातात.
Mixed sprouts and veg rice recipe is cooked easily in is good in nutritive value. It may be also known as mixed sprouts and veg biryani/pulao.
Mixed sprouts and veg rice recipe is cooked easily in is good in nutritive value. It may be also known as mixed sprouts and veg biryani/pulao.
Labels: Sprouts Rice, Rice, Sprouts, Veg Rice, Mix
veg rice, Cookware & Bakeware, Kitchen Storage, Dining
& Serving.