Jowar flour Thalipeeth Recipe- Nutritive Maharashtrian Recipes | ज्वारीचे थालीपीठ
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/04/jowar-flour-thalipeeth-recipe-nutritive.html?m=0
वेळ:
२० मिनिटे
२-३ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) २ वाटया ज्वारीचे पीठ
२) १ मोठा चमचा बेसन
३) १ कांदा बारिक चिरुन
घेतलेला
४) २ छोटे चमचे लाल मिरचीची
पूड
५) १ छोटा चमचा जिरे
६) हळद
७) मीठ
८) कोथिंबीर बारिक
चिरलेली
९) २ छोटे चमचे दही
१०) तेल
कृती:
एका भांडयात ज्वारीच पीठ,
बेसन, लाल मिरचीची पूड, हळद, जिरे व मीठ एकत्र करून घ्यावे.
त्यात बारिक चिरलेला कांदा,
कोथिंबीर, दही व आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
पीठ जास्त घट्ट किंवा पातळ
होणार नाही याची काळजी घ्यावी.
या पीठाचे एकाच आकाराचे समान
गोळे करून घ्यावे.
प्लास्टिक पिशविला थोडेसे तेल
लावून घ्यावे त्यावर तयार केलेला पीठाचा एक गोळा घेवून हळूहळू बोटांनी व तळहाथाने
पसरून घ्यावा व थालीपीठ बनवावे.
थालिपीठाच्या मध्यभागी बोटाने छिद्र करावे.
तवा गरम करावा व त्यावर थोडेसे तेल घालावे व थापूण घेतलेले थालीपीठ अलगतपने तव्यावर सोडावे.
२-३ मिनिटांनी पुन्हा एकदा
मधल्या छिद्रांमध्ये व आजूबाजूने तव्यावर तेल सोडावे.