Stuffed Karela/Stuffed Bitter Gourd Recipes | भरलेली कारली
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/05/stuffed-karelastuffed-bitter-gourd.html?m=0
Stuffed Karela recipe also known as bharleli karli is a popular
delicacy for the bitter gourd recipes lovers.Enjoy the bitter-sweet taste of it
NOW!
कारल म्हटल की बहुदा सर्वांच्याचा चेहऱ्यावरचा गोडवा पळून जातो पण
काही जण मात्र आवडीने खातात.
भरलेल कारल चविला आंबट, गोड, तिखट व थोडस कडवट असल तरी ते खाताना
तुमच्या तोंडाला पाणी सुटेल हे मात्र नक्की.
मी बनवायला शिकली माझ्या आईकडून.
मी बनवायला शिकली माझ्या आईकडून.
तर तुम्ही अश्याप्रकारे नक्की करून पहा भरलेली कारली.
२ व्यक्तींसाठी.
भरलेली कारली
बनविण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे:
१) २- ३ कारली
२) १ वाटी ओले
खोबरे
३) १ मोठा
कांदा
४) चिंचेचा कोळ २
मोठे चमचे
५) १/२ वाटी किसुन
घेतलेला गूळ
६) ४ मोठे चमचे
मालवणी मसाला
७) तेल २ चमचे
८) मीठ
चविनुसार
कृती:
कारल्याच्या
सालीचा खरखरित भाग सोलुन घ्यावा.
कारल्याचे दोन तुकडे
करावे व आतील बिया काढून घ्याव्या.
या तुकडयाना मधून चार काप
दयावे पूर्ण चिरु नयेत कारण आपल्याला त्यात मसाला भारायचा आहे.
ही कारली गरम पाण्यात
घालून उकडून घ्यावी.
मसाला बनविण्याची
कृती:
एका कढईत थोडेसे तेल
गरम करावे त्यात चिरलेला कांदा घालून परतावा थोडा लालसर झाला की त्यात ओले खोबरे
घालावे व वाटन खरपुस भाजून घ्यावे.
बाजूला करून थोडे थंड
होवू दयावे.
थंड झाले की त्यात
चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, मालवणी मसाला घालून मिक्सरला लावून बारिक वाटून
घ्यावे हे सारण चविला आंबट, गोड व थोडेसे तिखट लागते.
ह्या
सारणात बारिक चिरलेला कांदा घालवा.
ह्या पुढील कृती:
शिजवून घेतलेली कारली
पाण्यातून कढावी व त्यात बनवून ठेवलेले सारण भरावे.
अश्याप्रकारे सर्व
कारली भरून घ्यावी व उरलेले सारण तसेच ठेवावे.
२-३ मिनिटांनंतर
उरलेले सारण घालावे व थोडेसे पाणी घालून १० मिनिटे बारिक ग्यासवर शिजू दयावे .
थोडेसे चाखून पहावे
आवश्यक वाटल्यास थोडेसे मीठ घालावे.
Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor